news today, वैजापूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात

वैजापूर, ता.17 - शहरातील विविध कार्यालये ,शैक्षणिक संस्था, तसेच शासकीय कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन बुधवारी (ता.17) उत्साहात साजरा करण्यात आला.

वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले..

मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांच्याहस्ते सकाळी 9 वाजता झाले. याप्रसंगी तहसीलदार सुनील सावंत, नायब तहसीलदार रामेश्वर महाजन, श्री.कुमावत, धनश्री भलचिम, दिनेश राजपूत, प्रविण काकडे, पारस पेटारे, रामसिंग गोमलाडु, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, अंजलीताई जोशी, भाजपचे प्रशांत कंगले, दामोदर पारीख, ज्ञानेश्वर आदमाने, तलाठी जितेंद्र चापानेरकर, गजानन जाधव, योगेश पुंडे, श्री.बछे, मुख्याध्यापक पगारे यांच्यासह विविध कार्यालयप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचलन धोंडीराम राजपूत यांनी केले. हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारक येथे विरपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई जयराम भोसले यांनी ध्वज वंदन केले. तहसील कार्यलयात तहसीलदार सुनिल सावन्त, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनीही ध्वजवंदन केले. नगर पालिकेत मुख्याधिकारी भागवत बिघोत राजपूत यांनी ध्वजवंदन केले. 

नगरपालिकेत मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.त्याप्रसंगी मुख्याधिकारी भागवत बिघोत, माजी नगराध्यक्ष साबेर खान, सामाजिक कार्यकर्ते डॉ.व्ही.जी.शिंदे, धोंडीरामसिंह राजपूत व डॉ.निलेश भाटिया...

यासमयी माजी उपनगराध्यक्ष साबेरखान, डॉ.व्ही.जी.शिंदे, माजी नगरसेवक दशरथ बनकर, डॉ,निलेश भाटिया, बाबासाहेब गायकवाड, बी,बी,जाधव, मोतीलाल हिवाळे, डॉ,सविता निकाळे, प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, निर्मला जाधव, जगदीश चव्हाण यांच्यासह कर्मचारी  उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments