news today, वैजापूर तालुक्यात जोरदार पाऊस ; प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ

पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार...

वैजापूर, ता.26 / प्रतिनिधी - गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात जोरदार पाऊस होत असून छोट्या मोठ्या प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. डोंगरथडी भागातील मन्याड साठवण तलाव, कोल्ही मध्यम प्रकल्प व शिवना टाकळी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे तर ढेकू मध्यम प्रकल्पात 80 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शहरालगतच्या नारंगी धरणात 38 टक्के पाण्याची आवक झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने बोर दहेगाव मध्यम प्रकल्प व जरुळ लघु तलाव हे दोन प्रकल्प कोरडेठाक आहे. 

शिवना टाकळी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस होत असल्याने नाशिक जिल्हयातील विविध धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. पालखेड धरण 100 टक्के भरले असून या धरणातून अतिरिक्त पाणी डाव्या कालव्याव्दारे नारंगी धरणात सोडण्यात आले आहे. 85  क्युसेकने हे पाणी सोडण्यात आलेले असले तरी अत्यंत कमी प्रमाणात हे पाणी वैजापूर शहरालगतच्या नारंगी धरणात येत आहे. आतापर्यंत या धरणात 37.81 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पालखेड डाव्या कालव्यातून नारंगी धरणात पाण्याची आवक सुरू असून सद्या 50 क्युसेकने पाणी येत आहे.

     शहरालगतच्या नारंगी धरणात 37.81 टक्के जलसाठा          

शिवना टाकळी मध्यम प्रकल्पासह वैजापूर तालुक्यातील नारंगी मध्यम प्रकल्प, कोल्ही मध्यम प्रकल्प व बोर दहेगाव मध्यम प्रकल्प व इतर छोट्या मोठ्या प्रकल्पातील मंगळवार ता.16 सप्टेंबर 2025 रोजी उपलब्ध असलेला पाणीसाठा असा -

1) शिवना टाकळी मध्यम प्रकल्प - 100 टक्के
2) ढेकु मध्यम प्रकल्प - 80 टक्के 
3) नारंगी मध्यम प्रकल्प - 37.83 टक्के 
4) कोल्ही मध्यम प्रकल्प  - 100 टक्के
5) बिलोणी साठवण तलाव - 49.02 टक्के
6) खंडाळा लघु तलाव - 76.48 टक्के
7) सटाणा लघु तलाव - 70.55 टक्के
8) गाढे पिंपळगाव लघु तलाव - 100 टक्के
9) मन्याड साठवण तलाव - 100 टक्के 
10) जरुळ लघु तलाव - 0 टक्के
11) बोर दहेगाव मध्यम प्रकल्प - 0 टक्के 

      
 शिवना टाकळी प्रकल्पातील पाणीसाठा व विसर्ग 


  

Post a Comment

0 Comments