वैजापूर ता.17- शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान विविध लोक कल्याणकारी उपक्रम राबवून सर्वांगीण विकास साधण्यासाठी "सेवा पंधरवडा" हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.
वैजापूर उपविभागीय कार्यालयात तालुक्यातील वाडी व वस्त्यावरील आदीवासी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र प्रदान करुन या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम राजपूत, नायब तहसिलदार कुमावत यांच्याहस्ते तांड्यावरील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तत्पूर्वी तहसीलदार सुनील सावंत यांनी या पंधरवड्यात करावयाची जनकल्याणाची कामे व नियोजनाची माहिती दिली. पहिला टप्पा 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर, दुसरा टप्पा 23 ते 27 सप्टेंबर व तिसरा टप्पा 28 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 या दरम्यान तालुक्यातील 164 गावे व त्यातील 135 ग्रामपंचायतमध्ये आजपासून हे अभियान आरंभ झाल्याचे त्यांनी विशद केले. उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांनी याकामी ग्रामस्थ, सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.. धोंडीरामसिंह राजपूत यांनी प्रास्ताविक केले तर आभार नायब तहसीलदार कुमावत यांनी मानले
या प्रसंगी नायब तहसीलदार रामेश्वर महाजन, नायब तहसीलदार दिनेश राजपूत, धनश्री भलचिम, प्रवीण काकडे, पेशकार पारस पेटारे, जितेंद्र चापानेरकर, गजानन जाधव, महेश शिंदे, योगेश पुंडे, सुभाष गोमलाडू, मुख्याध्यापक पगारे,श्री वाघ,सूर्यवंशी, श्रीमती जोशी प्रशांत कंगले, दामोदर पारीख, ज्ञानेश्वर आदमाने आदी उपस्थित होते.
0 Comments