खंडाळा, ता.17- शालेय शिक्षण व क्रीडा विभागअंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विद्यासागर कन्या प्रशाला खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने खंडाळा येथे तालुकास्तरीय शालेय मुली व मुले यांच्या कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
विद्यासागर कन्या प्रशालेच्या ग्राउंडवर आयोजित या स्पर्धांचे उदघाटन शाळेचे अध्यक्ष बंड, ग्रामपंचायत सदस्य दिनकर मगर केंद्रीय मुख्याध्यापक मनोज गव्हाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य ताराचंद वेळंजकर, राजेंद्र जानराव, सुधीर बागुल, बाजीराव देसाई जिल्हा क्रीडा अधिकारी गजानन गायके, क्रीडा संयोजक मुख्याध्यापक शिंदे, योगेश सोनवणे, शिवाजी जाधव, बाळासाहेब व्यवहारे, राजेंद्र आंबेकर यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रास्ताविक बाळासाहेब व्यवहारे यांनी केले तर सूत्रसंचलन विजय राठोड यांनी केले.यावेळी क्रीडा शिक्षक व शाळेचे सहशिक्षक वृंद उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धेत 40 संघांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी 20 संघाला बाय मिळाला. 17 वयोगटात जि.प. प्रशाला लासुरगाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर विद्यासागर कन्या प्रशाला यांनी दुसरा व न्यू हायस्कूल लाडगाव यांनी तिसरा क्रमांक मिळविला 19 वयोगटात विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर कुलभूषण ज्युनिअर कॉलेज खंडाळा यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.भागीरथी महाविद्यालय नालेगाव यांनी तृतीय क्रमांक मिळविला. 14 वयोगटातील सामने हे 20 सप्टेंबरला होणार आहे.
0 Comments