news today, 'लाडक्या बहिणींची' आता ई - केवायसी पडताळणी

ई - केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत...

मुंबई, ता.20- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र महिला तसेच काही पुरुषांनीही लाभ घेतल्याची बाब उघडकीस आल्यापासून राज्य सरकार पुन्हा कामाला लागले आहे.गरजू व पात्र महिलांच्या खात्यातच पैसे जमा व्हावेत यासाठी आता लाभार्थी बहिणींची पडताळणी करण्यासाठी ई - केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई - केवायसी केल्यानंतरच या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे.महिला व बालविकास विभागाने या संदर्भात गुरुवारी (ता.18) आदेश काढले आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली, लोकप्रिय ठरलेल्या या योजनेमुळे महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले.मात्र आता या योजनेत दिवसेंदिवस अपात्र महिलांची संख्या वाढू लागली आहे.विशेष म्हणजे 14 हजार 298 पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. त्यामुळे आता सरकारकडूनच उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठीच लाडकी बहीण योजनेतील महिलांचे ई - केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.दोन महिन्यांच्या आत हे ई - केवायसी करायचे आहे.असे न करणाऱ्या महिला या योजनेस अपात्र ठरणार आहेत 

Post a Comment

0 Comments