news today, वैजापूर पालिकेचे मुख्याधिकारी बिघोत यांनी लडाख मॅरेथॉन स्पर्धा गाजवली

वैजापूर ता.15 - वैजापूर नगरपालिकेचे पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक भागवत बिघोत यांनी लडाख येथे आयोजित 22 की.मी.मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन हे अंतर दोन तास दोन मिनिटात पूर्ण करून पारितोषिक पटकावले. 

.             भागवत बिघोत राजपूत द फिनिशर 

मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी स्पर्धा गाजवून बक्षीस  जिंकून वैजापूरचे नाव प्रकाशझोतात आणले..त्यांच्या या विजयाबद्दल भाजप नेते डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, वैजिनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाशसेठ बोथरा, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंदिरामसिंह राजपूत, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सोपानराव निकम, वसंत क्लबचे सचिव जफर खान, पत्रकार घनश्याम वाणी, डॉ.सचिन राजपूत, सोन्याबापू गावडे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments