news today, जिल्हाधिकाऱ्यांनी केली सपत्नीक दाक्षायणी देवीची आरती..

लासूरगावात नवरात्रोत्सावाला भक्तीभावाने सुरुवात 

वैजापूर, ता .27 - वैजापूर तालुक्यातील लासुरगाव येथील ग्रामदैवत देवी दाक्षायणी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला सोमवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्नी करुणा स्वामी व मुली रुपाली व दिपाली यांच्या सोबत देवी दाक्षायणी मातेस वस्त्रलांकार परिधान करून मंत्रोपच्चारात विधिवत पूजा करून आरती केली. त्यानंतर नवरात्रोत्सावाला प्रारंभ झाला. यावेळी मंदिराचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत, पत्नी डॉ चंद्रमा सावंत व त्यांचे चिरंजीव अनुराग यांनीही आरती केली.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपत्नीक देवी दाक्षायणी मातेचे विधिवत पूजन करून आरती केल्यानंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली.

मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मंदिरात सोमवारी घटस्थापना नवरात्रारंभ व देवी दाक्षायणी मातेस वस्त्र अलंकार परिधान केल्यानंतर नवरात्र उत्सवास सुरुवात झाली. जवळपास चाळीस हजार भाविकांनी नतमस्तक होऊन मातेचे दर्शन घेतले.अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्र यांनी दिली. मंदिर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार तहसीलदार सुनील सावंत यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर डॉक्टर चंद्रमा सावंत यांनी करुणा स्वामी, रूपाली व दिपाली यांचा सत्कार केला. यावेळी मंडळ अधिकारी रिता पुरी, ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब राहींज, तलाठी प्रवीण पाटील, बीट अमलदार किरण गोरे, पोलीस पाटील बाबासाहेब हरिश्चंद्रे बबन हजारे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments