वैजापूर, ता.27- विमा क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण कामगिरी करून वैजापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विरगाव येथील विलास फकीरराव थोरात यांना यंदाही सलग पाचव्यांदा "एमडीआरटी" हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सन्मान मिळाला आहे. अमेरिकेत होणाऱ्या जागतिक परिषदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून, यामुळे वैजापूर तालुक्याच्या मानाच्या पानावर आणखी एक सुवर्णाक्षराने नोंद झाली आहे.
विलास थोरात यांनी गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात विम्याचे महत्व पटवून देण्याचे काम अखंडपणे केले. विशेषतः शेतकरी, लघु उद्योजक व ग्रामीण कुटुंबांना सुरक्षिततेची कवच देण्याचा त्यांचा ध्यास आहे. विम्याच्या माध्यमातून सामान्य जनतेत विश्वास निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहेत.
थोरात यांनी याआधी दोन वेळा विमा ग्राम तर दोन वेळा बिमा स्कूल योजना अंतर्गत पुरस्कार गावाला मिळवून दिले आहेत. त्यामुळे केवळ व्यक्तिगत नव्हे तर सामाजिक स्तरावरही त्यांचे योगदान लक्षणीय ठरते.
या यशाबद्दल वैजापूर शाखाधिकारी मुकुंद ठाकूर, कन्नड शाखेचे ओम उंदनशिव व महेंद्र भारती, तसेच उपस्थित विकास अधिकारी संभाजी गारे, अतुल कुलकर्णी, विजय भडके, शांताराम लहिरे, गोकुळ निकम व संदीप बारसे यांनी त्यांचे अभिनंदन केले. याशिवाय मित्रपरिवार व ग्रामस्थांनी देखील थोरात यांचा सत्कार करून अभिमान व्यक्त केला.
0 Comments