news today, डोंगरथडी भागात मुसळधार पाऊस ; नद्यांना पूर

लोणी खुर्द येथील इंदिरानगर भागाला पाण्याचा वेढा, मदतकार्य सुरू 


हसन सय्यद 
--------------------------
लोणी खुर्द, ता.28-  वैजापूर तालुक्यातील डोंगर थडी भागात लोणी खुर्द, वाकला, तलवाडा आणि चिकटगाव, भादली,पाराळा  टुनकी या गावांसह अनेक गावात  शनिवार  रात्री   अचानक जोरदार मुसळधार पावसाने पुन्हा झोडपले अक्षरश: पावसाने धुमाकूळ घालत हाहाकार माजवला.  लोणी खुर्द येथील इंदिरानगर भागातील पन्नास  कुटुंबियांना अक्षरशः पाण्याने वेडले असून त्यांच्यासाठी दुपारपर्यंत मदत कार्य सुरू होते. अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आला. पुरामुळे नदीपात्र बदलले, शेतजमिनी वाहून गेल्या आणि अनेक ठिकाणी शेतांना तलावाचे स्वरूप आले. ढेकू व शिवना, वाळकी, खळगा नदीने रौद्र रूप धारण केल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले.
पावसामुळे रस्ते वाहून गेले, आणि खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिके पिवळी पडली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तलवाडा,लोणी खुर्द,वाकला,बाभूळतेल,नायगव्हाण,अंचलगांव,टुनकीखरज,तित्तरखेडा,भादली,चिकटगाव,पाराळा परिसरातील शेतजमिनींची माती वाहून गेली आहे.


अतिवृष्टीचा फटका बसला अनेक ठिकाणी  झाडे उन्मळून पडली, घरांची पडझड, बाजारपेठेत पाण्याने तलावाचे स्वरूप केले. जिल्हा मध्यवर्ती  बँकेसह ,तलाठी कार्यालयात अक्षरश पाणी साचले अनेक दुकानांमध्ये शिरले पाणी.

प्रतिक्रिया. ..
ज्या शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अधिकाऱ्यांनी जाऊन स्पेशल पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करणे गरजेचे आहे. वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा  १००% मंजूर करावे .
 (संतोष सूर्यवंशी. शासकीय पीक विमा समिती सदस्य)

लोणी खुर्द परिसरात  झाडे उन्मळून पडली. बँक, तलाठी कार्यालयासह घरांमध्ये  पाणी शिरले, घरांची पडझड. नद्यांना आलेल्या पूराचे दृष्य. (छाया : हसन सैय्यद.)

Post a Comment

0 Comments