news today, नगराध्यक्षपदासाठी सोमवारी मुंबईत आरक्षण सोडत ; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष


वैजापूर, ता.04 - गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने राज्य सरकार आणि निवडणूक आयोग कामाला लागले आहेत. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (ता.06) मुंबईत काढली जाणार आहे.नगराध्यक्षपदाच्या या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

मंत्रालय, मुंबई येथे सायंकाळी सहा वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार असून नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीवेळी राष्ट्रीय आणि राज्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या दोन प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासंदर्भात नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी (छापवाले) यांनी शुक्रवारी (ता.03) पत्र काढले आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीची प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिध्द होणार आहे.

Post a Comment

0 Comments