news today, धनादेश अनादर प्रकरणी एक महिन्याचा कारावास व 1 लाख 20 हजार रुपये दंडाची शिक्षा


वैजापूर याता. 06 - : व्यवसायासाठी रकमेची गरज असल्याचे सांगून आरोपीने हात उसने म्हणून घेतलेल्या 70 हजार रुपयांच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश अनादरीत झाल्याप्रकरणी आरोपीस एक महीना कारावास, एक लाख वीस हजार रुपये दंड व दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचे तसेच यात कसूर केल्यास अतिरिक्त करावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. ए. बेंद्रे यांनी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर येथील व्यापारी दर्शन विजयसी रामैय्या यांचे आरोपी कुणाल सुभाष जगताप  रा. सुंदर गणपती गल्ली, वैजापूर याचेसोबत मित्रत्वाचे संबंध होते. व्यवसायासाठी रकमेची गरज असल्याचे सांगून आरोपी कुणाल जगताप याने फिर्यादी दर्शन रामैया यांच्याकडे 70 हजार रुपयांची मागणी केली व सदरील रक्कम तीन महिन्यांत परत करण्याची हमी दिल्यामुळे फिर्यादिने आरोपीस दि. 11 नोव्हेंबर 2011 रोजी हातउसने म्हणून 70 हजार रुपये दिले होते.

तीन महिने झाले तरी आरोपीने घेतलेली रक्कम परत न केल्यामुळे फिर्यादिने आरोपीकडे सदर रकमेची वारंवार मागणी केली. तेंव्हा शेवटी आरोपीने दि. 05 मार्च 2013 चा दि. वैजापूर मर्चंट्स को-ऑप. बँक लि. शाखा वैजापूर चा सत्तर हजार रुपयांचा धनादेश दिला. सदरचा धनादेश फिर्यादने बँकेच्या खात्यावर वटविणेसाठी टाकला. परंतु आरोपीने फिर्यादीस दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आला. त्यानंतर फिर्यादिने ॲड. एस. एस. ठोळे यांचेमार्फत आरोपीस नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम आणून देण्यास सांगितले होते. परंतु आरोपीने मुदतीत रक्कम न आणून दिल्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध वैजापूर येथील न्यायालयात ॲड. एस. एस. ठोळे यांचेमार्फत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम 138 नुसार फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील फिर्याद, सबळ साक्षीपुरावा व मुद्देसूद युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. एस. एस. ठोळे व ॲड. आकाश ठोळे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments