news today, वडिलोपार्जित जमिनीवरून दोन गटात हाणामारी ; 19 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

वैजापूर, ता.26 -  वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून बहीण व भावांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना 20 जानेवारीला सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास रोटेगाव शिवारात गट क्रमांक 34 मध्ये फौजी ढाबा येथे घडली. याप्रकरणी देण्यात आलेल्या परस्पर विरोधी फिर्यादीवरून 19 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात पहिल्या गुन्ह्यात आठ जणांना आरोपी करण्यात आले असून दुसऱ्या गुन्ह्यात एकूण अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
       
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोटेगाव शिवारात शेत गट क्रमांक 34 मध्ये अकरा गुंठे जमीन आहे. या जमिनीच्या वाटणीवरून ज्वालासिंग पोपटसिंग राजपूत या दोन भावांचे त्यांचा मोठा भाऊ शैलेश पोपटसिंग राजपूत व बहीण रोहिणी मनोज परदेशीं (राहणार पुणे) यांच्याशी किरकोळ वाद सुरु आहेत. बहीण रोहिणी या त्यांची दोन मुले शिवम व ऐश्वर्या हे काही दिवसांपूर्वी भाऊ शैलेश यांच्याकडे आले होते. २० जानेवारीला रोहिणीने शेतजमिनीच्या मोजणीसाठी भाऊ ज्वालासिंग याला संतोष याच्या दुकानावर बोलावले. त्यावेळी त्या ठिकाणी रोहिणी हिच्यासह दोन मुले, पुतण्या पृथ्वीराज शैलेश राजपूत व एक अनोळखी इसम आला होता. ते शेती विक्री करण्याबाबत बोलत होते.तसेच जेसीबीं वाल्याला फोन केला असून तो आल्यावर तार कंपाउंड बसवून घेऊ असे बोलत होते.
तार कंपाऊंड बसवण्यास विरोध केल्याने आरोपीनी ज्वालासिंग बहीण व त्यांच्या भाच्यांना मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार ज्वालासिंग यांनी केली आहे. त्यावरून रोहिणी मनोज परदेशीं, शुभम मनोज परदेशीं, ऐश्वर्या मनोज परदेशीं (सर्व रा. पुणे), शैलेश पोपटसिंग राजपूत, पृथ्वीराज शैलेश राजपूत, शिवलालसिंग उत्तमसिंग राजपूत, यश शिवलालसिंग राजपूत, कल्पना शिवलालसिंग राजपूत (सर्व रा. रोटेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
    
या प्रकरणी रोहिणी परदेशीं यांनी दिलेल्या परस्पर विरोधी फिर्यादीवरून अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुशालसिंग उत्तमसिंग राजपूत (वैजापूर), जीवनसिंग बाळुसिंग राजपूत, शुभम बाळुसिंग राजपूत, ज्वाला पोपटसिंग राजपूत, संतोष पोपटसिंग राजपूत, क्रिश संतोष राजपूत, आकाश संतोष राजपूत, दीपा संतोष राजपूत, जया ज्वालासिंग राजपूत, बसंतीबाई बाळुसिंग राजपूत व बलवंतसिंग उत्तमसिंग राजपूत (सर्व राहणार रोटेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाचा अधिक  तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments