वैजापूर, ता.24 - नांदेड येथे 25 जानेवारीला धर्मजागरण समिती व राज्य सरकार यांच्यातर्फे "गुरू तेग बहादूर जन्म शताब्दी निमित्त समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरू तेगबहादूर साहेबाजी यांचा इतिहास व कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यभर 'हिंद दी चादर 'या नावाने माहिती रथ यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचा भाग म्हणून हा रथ येथील गुरुद्वारात समोर आल्यावर या रथाचे शहरातील शीख, पंजाबी व सिंधी बंधू, भगिनी यांनी जोरदार स्वागत केले.
    
गुरुद्वारात बंधू-भगिनी यांनी गुरू नानाकजी यांचे पूजन,भजन आणि अरदास पठण केले. या प्रसंगी धोंडीरामसिंह राजपूत यांची उपस्थिती होती. त्यांना गुरुतेग बहादूर प्रतिमा व जीवन चरित्र पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला. रथाचे सहकारी यांच्यासह ग्यानसिंग पोथीवाल, गुरूंदीपसिंग सब्बरवाल दलजीतसिंग खनिजो, चरणजीतसिंह खनिजो, प्रीतिताई खनिजो, सुरजित कौर, अमरप्रित आहुजा, मनोज पंजाबी, सुलोचना पंजाबी, सरिता आहुजा, सन्मित खनिजो उपस्थित होते. या रथाच्या माध्यमातून गुरू तेगबहादूर साहेबाजी यांच्या कार्य कर्तृत्वाची  झलक चित्र फितीच्या माध्यमातून दाखबिण्यात येत आहे.