news today, शिऊर जिल्हा परिषद गट ; निकम यांचा आक्षेप निकाली

पैठणपगारे यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा ...

वैजापूर, ता.24 - वैजापूर तालुक्यातील शिऊर जिल्हा परिषद गटाच्या निवडूणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे सुनील गणपतराव पैठणपगारे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत त्यांना अपात्र ठरवण्यासाठी संजय मच्छिन्द्र निकम (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी दाखल केलेलं आक्षेप अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अरुण जऱ्हाड यांनी अमान्य करत निकालात काढला आहे. अर्जदार व आक्षेपकर्ता या दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक नियम १९६२ च्या कलम १४(१)सुनील पैठणपगारे यांचे नाम निर्देशनपत्र अपात्र ठरत नसल्याने पैठणपगारे यांना या निवडणुकीत दिलासा मिळाला आहे. सुनील पैठणपगारे हे २००२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले होते व त्यावेळीही याच मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आला होता व न्यायालयाने हा आक्षेप फेटाळला होता असा युक्तीवाद पैठणपगारे यांच्यातर्फे सुनावणीच्या वेळी करण्यात आला होता.
    
सुनील पैठणपागरे हे संत बहिणाबाई कनिष्ठ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिऊर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून ही संस्था १०० टक्के अनुदानित आहे. त्यामुळे ते शासनाचा पगार व लाभ घेत असल्याने ते शिऊर गटातून निवडणूक लढण्यास अपात्र आहेत. तसेच त्यांच्या पत्नी या देखील साफियाबदवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. हे दोघे एकत्रित कुटुंबात राहून शासनाचा लाभ घेतात. त्यांनी निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी शासनाची कुठलीही पूर्व परवानगी घेतलेली नाही असा आक्षेप निकम यांनी घेतला होता.

परंतु, सुनील पैठणपगारे यांनी सदर संस्था ही खासगी संस्था असून तिचे व्यवस्थापन व नियंत्रण हे सरकारकडे नसून एका खासगी मंडळाकडे आहे. न्यायालयाने अनेक निकलामध्ये केवळ अनुदान मिळते म्हणून खासगी संस्थेतील कर्मचारी शासकीय कर्मचारी ठरत नाही असे स्पष्ट केल्याचा युक्तीवाद मांडला.तसेच त्यांनी भारतीय ग्रामीण पुनरर्चना व जे. के. नॉलेज सेन्टर यांच्याकडे अर्ज करून ही निवडणूक लढवण्याची परवानागी मागितली होती. त्यानुसार त्यांच्या व्यवस्थापनाने ठराव घेऊन परवानगी दिल्याचे दिसून येते.तसेच सुनील पैठणपगारे यांनी दाखल केलेल्या नाम निर्देशन पत्राचे अवलोकन केले असता त्यात त्यांच्या पत्नीचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे दिसून येते असे डॉ जऱ्हाड यांनी निकालात स्पष्ट केले आहे.

प्रभाकर बारसे यांचा उमेदवारी अर्ज मागे ...

वैजापूर तालुक्यातील वांजरगाव जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार प्रभाकर बारसे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. २७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments