news today, वैजापूर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांची निवड

वैजापूर, ता.24 - वैजापूर नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणूकसाठी शुक्रवारी(.ता 23) सकाळी अकरा वाजता फुले आंबेडकर सभागृहामध्ये पिठासीन अधिकारी भागवत बिघोत (मुख्याधिकारी, नगर परिषद) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. या सभेत पाच विषय समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशनपत्र प्राप्त झाल्याने सर्व सभापतींची निवड बिनविरोध झाल्याचे पिठासीन अधिकारी बिघोत यांनी जाहीर केले.
       
सभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे तीन समित्यांचे सभापती पद गेले आहे तर शिवसेनेकडे दोन विषय समित्यांचे सभापती पद आहे. महिला व बाल कल्याण समितीचे उपसभापती पद शिवसेनेकडे गेले आहे. निवडून आलेले सभापती पुढीलप्रमाणे ...
    
शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे नगरसेवक बाबासाहेब सुखदेव पुतळे यांची निवड झाली आहे. स्वच्छता, वैद्यकीय व आरोग्य सेवा समिती सभापती सय्यद अमीर अली महेबूब अली (शिवसेना), महिला व बाल कल्याण समिती उपसभापती सुरेखा सुरेश घाटे (शिवसेना).
पाणी पुरावठा व जल निःस्सारण समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक दशरथ बनकर यांची निवड झाली आहे. नियोजन समिती सभापती राजेश बळवंता गायकवाड (भाजप), महिला व बाल कल्याण समिती सभापती संगीता राजुसिंग राजपूत (भाजप)

नगर परिषदेचे उपाध्यक्ष रियाज अकिल शेख गब्बू शेठ हे सार्वजनिक बांधकाम समितीचे पदसिद्ध सभापती आहेत. तसेच स्थायी समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका पूजा अविनाश त्रिभुवन यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
  या सभेला नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशीं, उपनगराध्यक्ष रियाज अकिल शेख, जयश्री राजपूत, सुवर्णा ठोंबरे, पारस घाटे व ईतर सदस्य उपस्थित होते. पिठासीन अधिकारी म्हणून मुखयाधिकारी भागवत बिघोत यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments