news today, महालगांवच्या उपसरपंचपदी रुपाली जाधव यांची बिनविरोध निवड

वैजापूर, ता.09 - महालगाव (ता.वैजापुर) ग्रामपंचायतीच्या  उपसरपंचपदी रुपाली जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुरेश आल्हाट यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे पद रिक्त झाले होते  निवडणुक अधिकारी मंडळ अधिकारी दिपक कराळे, तलाठी श्रीकांत म्हस्के, ग्रामविकास अधिकारी विजय वांढेकर, यांनी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी बारा वाजता पार पडली यात रुपाली जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
   
वैजापूर तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रुपाली जाधव यांची निवड करण्यात आली.

या निवडीचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, पुंजाराम काळे, डाॅ. अभय थावरे, हरिभाऊ आल्हाट, कैलास शेळके, अमोल मलिक, गणेश शेळके, अंबादास जाधव, प्रकाश आल्हाट, नवनाथ गायकवाड, किरण आल्हाट, राहुल गायकवाड, महेंद्र आल्हाट, सिध्दार्थ जानव, रभाजी आल्हाट, सरपंच रोहिणी काळे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर शेळके, सुधाकर गलांडे, गणेश आहेर, कल्याण झिंजुर्डे, लिलाबाई आल्हाट, शितल आल्हाट, सोनल आल्हाट, लताबाई हुमे, सत्यभामा मतकर यांनी स्वागत केले.



Post a Comment

0 Comments