वैजापूर, ता.21 - राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित AI समिट 2026 दरम्यान यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या शर्टलेस आंदोलनामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. समिटच्या पाचव्या दिवशी (शुक्रवारी) घडलेल्या या प्रकारावर वैजापूर येथे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेनेतर्फे काँग्रेस पक्षाच्या कृत्याचा शनिवारी (ता.21) येथे निषेध करण्यात आला.
वैजापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करताना पदाधिकारी व कार्यकर्ते
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंखे, शहरप्रमुख पारस घाटे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर टेके, जिल्हा परिषद सदस्य श्रीराम गायकवाड, शंकरराव मुळे, महेश बुनगे, बळीराम सिंग राजपूत, नगरसेवक स्वप्निल जेजुरकर, राहुल त्रिभुवन महिला आघाडी जिल्हा संघटक सुलभाताई भोपळे, आहेर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन आपला तीव्र निषेध नोंदवला.
0 Comments