news today, वैजापूर तालुक्यात शिवजयंती उत्साहात

वैजापूर, ता.19 -  वैजापूर शहर वं ग्रामीण भागात आज शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला भेट देत सर्व नागरिकांनी रयतेच्या राजाला अभिवादन केले. याशिवाय भगवे फेटे घालून तसेच भगवा ध्वज फडकवत, मिरवणूक, दुचाकी फेरी काढून शिवप्रेमीनी जयंती साजरी केली.
    
येथील विद्याधन इंग्रजी माध्यमाच्या विद्यालया
तर्फे विविध उपक्रमातून शिवाजी महाराजांना वंदन
करण्यात आले.' छत्रपती शिवाजी महाराज की जयं ', 'जय भवानी जय शिवराय,' हर हर महादेव, 'राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा विजय असो' अशा घोषणा देत व लेझीम खेळत,लाठी -काठी, दांड पट्टा चालवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ सजीव देखावा सादर करीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अकराव्या वर्षी शानदार प्रदर्शन केले.
     
येवला नाका ते  शिवाजी महाराज पुतळ्यापर्यत, लेझीम खेळणे, काठी फिरविणे तसेच विविध कला, कौशल्य व गुणदर्शन करीत फेरी काढून छत्रपती शिवाजी महाराजाना अभिवादन केले. संस्थेच्या अध्यक्षा आशा गायके, उपाध्यक्ष कल्याणी गायके व सचिव दिगंबर गायके यांच्या उपस्थितीत आमदार  रमेश बोरनारे व निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी प्रतिमा पूजन केले. शोभा मिरवणूक  पुतळ्यापर्यंत  नेण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. 
    
नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांनी मिरवणूकीला भेट दिली. माजी नगराध्यक्ष साबेर खान, संजय बोरनारे, रामहरी बापू जाधव, राजेंद्र साळुंके, नगरसेवक बाबासाहेब  पुतळे, अविनाश त्रिभुवन, श्रीकांत साळुंके, शांतीलाल कोठाळे, प्राचार्य आरती पाटील, मुख्याध्यापक राहुल जाधव, मोहिनी मापारी, महेश दिवेकर, गोविंदा त्रिभुवन, पूनम भागवत, श्रद्धा कासार, महादेवी शिनगारे, पूर्वा जाखडे, योगिता पाटणी, अर्चना व दुर्गा गायकवाड, तुषार तूपे, दीपाली भुजाड उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments