news today, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व नौगाजी बाबा उरूस शांतता, बंधुभावाने साजरा करा - उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे

वैजापूर येथे शांतता समितीची बैठक संपन्न ...

वैजापूर ता.09 - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती एप्व  हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले सय्यद शाह रुकनुद्दिन उर्फ 
नौगाजी बाबा यांचा उरूस/यात्रा उरूस 14 ते 17 एप्रिल दरम्यान साजरा होत आहे.हे दोन्ही उत्सव शहरातील सर्व समुदायातील  नागरिकांनी शांतता,बंधुता व एकजुटीने साजरे करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात आयोजित शांतता समितीक्या बैठकीत केले
ते म्हणाले की, सोशल मीडियावर स्फोटक वक्तव्य टाळा, कुणाच्याही धार्मिक भावना दुखऊ नका, डीजे चा आवाज कमी ठेवा. ठरवून दिलेल्या ध्वनी पर्यंत आवाज असावा. नौगाजी बाबा उरुस यात्रेवरही  पोलिसांची कडक नजर असेल तेथे काही ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करून हे दोन्ही उत्सव शांततेत व बंधूभावाने साजरे करावे असे आवाहन केले.

प्रास्तविकात शांतता समिती सदस् धोंडिरामसिंह राजपूत यांनी दरवर्षी साजरा होणाऱ्या या उत्सवांची माहिती दिली. सदस्य अल्ताफ बाबा, सलीम वैजापूरी, राजू पठाण, काझी हाफीजुद्दीन, अकिल कुरेशी, साबेर पठाण यांनी तसेच विजय त्रिभुवन,अंजली जोशी,जयमाला वाघ,साहेबराव पडवळ, विनोद राजपूत,सागर अस्वले, आर,के,शेख यांनी महत्वाच्या सूचना केल्या.

या बैठकीस प्रकाशसेठ बोथरा, प्रशांत सदाफळ, निलेश पारख , माजी नगरसेविका सुप्रिया व्यवहारे  मंजुषा ढाकरे, पालिकेचे श्री .मिरगु, वीज वितरण व तहसील चे प्रतिनिधी याच्यासह विविध क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments