नवकार महामंत्र दिवस हा जाप, श्रद्धा, भक्ति आणि आस्थामुळे बनला ऐतिहासिक आठवण ...
वैजापूर, ता.09 - जितो आणि नवकार फाउंडेशन तर्फे विश्व नवकार दिनाच्या पहिल्या वर्धापदिनानिमित्त जगातील 108 देश आणि भारतातील 6 हजार पेक्षा अधिक मंदिर आणि स्थानकात आयोजित 'विश्व नवकर दिवस' जपानुष्ठान आज श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. वैजापूर शहरातही सकल जैन समाजातील 450 पेक्षा जाधिक श्रावक आणि श्राविकांनी एका स्वरात हजारो नवकार महामंत्राचा जाप करून विश्वशांती ची प्रार्थना केली व 1008 करोड महामंत्र जपानुष्ठानच्या संकल्पूर्तीचा आनंदोत्सव साजरा केला.
नवकार फाऊंडेशन आणि जितो छञपती संभाजीनगरतर्फे येथील स्व.बन्सीलाल रुपचंदजी जैन स्थानकात नवकार आराधक, उपप्रवर्तक परमपूज्य श्री. तारकऋषीजी म.सा., आगमज्ञाता परमपूज्य श्री.सुयोगऋषीजी म.सा. परमपूज्य श्री. शिबेंदुऋषीजी म.सा. यांच्या सानिध्यात आणि वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळासाहेब संचेती व शोभाचंदजी संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली हा महामंत्र जपानुष्ठान संकल्पपूर्ती आनंद सोहळा साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सकल जैन समाज वैजापूर चे प्रकाशचंद बोथरा, विजय कासलीवाल, डॉ.संतोष गंगवाल, बाबुलाल संचेती, हेमंतकुमार संचेती, रिखबचंद संचेती, जीवनलाल पारख, हिरालाल संचेती, अशोक संचेती,परस्माल बोथरा, पुखराज बाफना, महावीरसेठ बाफना, उमेशकुमार संचेती, महावीर बांठीया, संतोष लोढा, प्रफुल्ल संचेती, निलेश पारख, पराग छाजेड, नंदलाल लोढा, दिपक संचेती, स्वप्नील संचेती, जवाहर कोठारी, प्रदीप रायसोनी, प्रकाश हिरण, योगेश संकलेचा, राजेंद्र संचेती, संजय संचेती, अनिल संचेती, परेश संचेती, अनिल हिरण यांच्यासह श्रावक - श्राविकां मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
यावेळी शहरातील सकल जैन समाजातील श्रीमती ज्योतीबाई मोतीलालजी संचेती परिवार आणि श्रीमान प्रकाशचंदजी आनंदीलाल बोथरा परिवारातर्फे स्नेह उपहार देण्यात आले.
जैन विहार सेवा समिती, जैन सोशल ग्रुप आणि सकल संघाच्या कार्यकर्त्यांनी हा अध्यत्मिक जपाणुष्ठान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. एमबीबीएस च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या डॉ.हर्ष धरमचंद संचेती या सकल जैन समाजातील विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही यावेळी करण्यात आला.
निलेश पारख यांच्या आभार प्रदर्शन केले. त्यानंतर जपाणुष्ठान कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments