वैजापूर, ता.09 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी म्हणून वैजापूर वकील संघ ग्राहक संस्थेकडून वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.रियासतअली यांची आज निवड करण्यात आली.
ॲड. रियासत अली
वैजापूर जिल्हा बँक निवडणूक प्रतिनिधी निवडण्यासाठी वैजापूर वकील संघ ग्राहक सहकारी सोसायटीची मासिक सभा गुरुवारी (ता.09) दुपारी सोसायटी कार्यालयात वकील संघाचे माजी अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. संस्थेचे चेअरमन अँड.सोपान पवार यांनी अँड. सय्यद रियासत अली यांचे नाव सुचविले तर संस्थेचे सचिव अँड प्रविण साखरे यांनी अनुमोदन दिले. संस्थेचे व्हाइस चेअरमन अँड.आर.डी.थोट, सल्लागार अँड. आण्णासाहेब निर्मळ, उपसल्लागार अँड. सय्यद रियासतअली, अँड. संजय बारसे, अँड सविता पाटणी, सहसचिव अँड. नुजहत बेगम यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. संस्थेचे कर्मचारी योगेश पवार यांनी सहाय्य केले.
0 Comments