news today, वाढती महागाई, इंधन दरवाढ व फसव्या कर्जमाफी विरोधात शिवसेनेचे जनआक्रोश आंदोलन

छञपती संभाजीनगर, ता 07 - शिवसेना -  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि फसव्या कर्जमाफी विरोधात रविवारी (ता.07) छञपती संभाजीनगर येथे 'मंहगाई के अच्छे दिन' जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. सायकलवरून प्रतीकात्मक फेरी काढत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला तसेच रिकामे गॅस सिलिंडर आणून घरगुती गॅसच्या गगनाला भिडलेल्या दरांकडे सरकारचे लक्ष वेधले.

सकाळी 9.30 वाजता क्रांती चौकात आमदार अंबादास दानवेयांच्या संयोजकत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख अनिल चोरडिया, राजेंद्र काळे, विजयराव साळवे, सुनील शिंदे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, राजू इंगळे, मनाजी पाटील मिसाळ,रमेश सावंत, किशोर कच्छवाह, अविनाश पाटील, अंकुश सुंब, दिनेश मुथा, डॉ.अण्णासाहेब शिंदे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम,मनोज गायके, सुनीता आउलवार, राखी परदेशी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, धर्मराज दानवे, विठ्ठल डमाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

'बहुत हुई महंगाई की मार, हटा डालो मोदी सरकार..., महंगाई हटवा... मोदी हटवा., अच्छे दिन नाहीत, महंगे दिन., जवाब दो मोदी सरकार., इंधन दरवाढ रद्द करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे, ही तर कर्जवसुली.. अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.. 

महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले असून, शेतकरी, कामगार, महिला आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. केंद्र व राज्य सरकारने तातडीने महागाई नियंत्रणात आणून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना आंदोलन अधिक तीव्र करेल, असा इशारा यावेळी केंद्र आणि राज्य सरकारला शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments