उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश सोहळा संपन्न ; वैजापूर पालिकेचे माजी उपाध्यक्ष शेख अकील कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत सामील
वैजापूर, ता. 08/ प्रतिनिधी -
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट ) जाहीर प्रवेश केला. वैजापूर पालिकेचे माजी उपाध्यक्ष शेख अकील शेख गफुर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मंगळवारी (ता.08) मुंबईत पार पडला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष प्रवेश घेतलेल्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलतांना पवार यांनी पक्षप्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा समजावून सांगितली. त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामात स्वतःला झोकून द्या, समन्वयानं कामं करा तसेच सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणावर करण्याच्या सूचना केल्या.
शिक्षक आमदार सतीश चव्हाण यांनी हा प्रवेश घडवून आणला. वैजापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शेख अकील यांच्यासह त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक तथा बाजार समितीचे संचालक शेख रियाज शेख अकील, शेख इरफान शेख गणी, माजी नगरसेवक सय्यद हिकमत, एमआयएमचे तालुकाध्यक्ष अकील कुरेशी, राष्ट्रवादीचे माजी शहरप्रमुख अल्ताफ बाबा, अँड.राफे हसन, सुलतान कुरेशी, खंडाळ्याचे उपसरपंच मोबीन शेख, वडजीचे माजी सरपंच हकिम शेख, म्हस्कीचे सरपंच शफीक शेख, भागिनाथ त्रिभुवन, विजय त्रिभुवन, धर्मेंद्र त्रिभुवन, शाहनुर शेख आदींनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.
याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांसाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले. यांपैकी एकजण अधिसभेवर (सिनेट), दूसरा विद्यार्थी परिषद उपाध्यक्षपदी तर तिसरा विद्यार्थी परिषद संयुक्त सचिव पदी निवडून आला. या तिन्ही उमेदवारांचा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ.सतीश चव्हाण, माजी जिल्हा परिषद पंकज पाटील ठोंबरे, नबी पटेल आदी यावेळी उपस्थित होते.
0 Comments