राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस वैजापूर शहराध्यक्ष अँड.ज्योतीताई कापसे यांनी न्यू हायस्कूल वैजापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते पंकज पाटील ठोंबरे, अँड .राफे हसन पिरजादा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी नगरसेवक शेख रियाज शेख अकील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष हिराताई जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थिनी यांची यावेळी उपस्थिती होती.
0 Comments