वैजापूर, ता. 09 / प्रतिनिधी -
वैजापूर पंचायत विविध योजनांमध्ये होत असलेल्या गैरकारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने मंगळवार ता. .८ जुलै २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर भीक आंदोलन केले. आंदोलनाच्या सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पंचायत समिती कार्यालयापर्यत भीक मागून आपला विरोध व्यक्त केला.
तद्नंतर वंचित बहुजन आघाडीने गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्न प्रलंबित असून ग्रामपंचायत हद्दीत लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात वैजापूर पंचायत समिती अपयशी ठरत आहे. तसेच, गाय गोठा योजना, शेततळे योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष घटक योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, एमआरजीएस विहीर योजना आदींच्या मंजुरीसाठी संबंधित विभागाचे अभियंते, ग्रामसेवक आणि इतर कर्मचारी लाभार्थ्यांकडून जिओ-ट्रॅकिंग व फोटो काढण्याच्या बदल्यात पैशाची मागणी करतात यामुळे सर्वसामान्य गरीब लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत असून पंचायत समितीच्या या यंत्रणेमधील भ्रष्टाचार थांबविण्यात यावा अशी मागणी यावेळीआंदोलनकर्त्यांनी केली करण्यात आली.
0 Comments