news today, नारंगी धरण 21 टक्के भरले ; पाण्याची आवक सुरू




वैजापूर, ता.26 / प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस होत असल्याने नाशिक जिल्हयातील विविध धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. पालखेड धरण 100 टक्के भरले असून या धरणातून 1592 क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. पालखेड धरणातून अतिरिक्त पाणी डाव्या कालव्याव्दारे नारंगी धरणात सोडण्यात आले आहे.100 क्युसेकने हे पाणी सोडण्यात आलेले असले तरी अत्यंत कमी प्रमाणात हे पाणी वैजापूर शहरालगतच्या नारंगी धरणात येत आहे. आतापर्यंत या धरणात 20.95 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पालखेड डाव्या कालव्यातून नारंगी धरणात पाण्याची आवक सुरू असून सद्या 85 क्युसेकने पाणी येत आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून नारंगी धरणात पाण्याची आवक सुरू आहे

वैजापूर तालुक्यातील नारंगी मध्यम प्रकल्प, कोल्ही मध्यम प्रकल्प व बोर दहेगाव मध्यम प्रकल्प या तीन धरणात आज ता.26 ऑगस्ट 2025 रोजी उपलब्ध असलेला पाणीसाठा असा -

1) नारंगी( मध्यम प्रकल्प ) 
पाणीपातळी - 530.50 M 
एकूण क्षमता - 4.205 Mm3 
उपयुक्त क्षमता - 2.410  Mm3
टक्केवारी- 20.95%
2) कोल्ही (मध्यम प्रकल्प ) 
एकूण पाणीपातळी - 560.380  M 
एकूण क्षमता - 3.600 Mm3
उपयुक्त क्षमता - 3.240 Mm3
टक्केवारी - 100  %
3) बोरदहेगाव - (मध्यम प्रकल्प ) 
पाणीपातळी - 516.30
एकूण क्षमता - 0.91
उपयुक्त पाणीपातळी - Nil
टक्केवारी  - Nil








  

Post a Comment

0 Comments