मुंबई, ता.26 - मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मराठा मंत्रिमंडळ उप समितीची बैठक तातडीने पार पडली. या बैठकीत न्यायमूर्ती निवृत्त संदीप शिंदे यांच्या समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून हैदराबाद आणि सातारा गॅझेट बद्दल रात्र प्राथमिक चर्चा झाल्याचे उपसमितीचे अध्यक्ष विखे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी याचा अर्थ कुणबी दाखले देण्यासाठी शासनाने सगळे सोयऱ्यांची मागणी मान्य करावी तसेच हैदराबाद आणि सातारा तात्काळ लागू करावे अशा जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत. परंतु नवे सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले तरी शासनाने यासंबंधी पावले न उचलल्याने जरांगे पाटील यांनी मुंबईतील आजाद मैदानात आंदोलन करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी ते 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच करणार आहेत गणेशोत्सव काळात जरांगे पाटील मुंबईत येत असल्याने महानगराची दैना उडेल. यासाठी शासन आणि प्रशासनाने तात्काळ पावले उचलून त्यांनी मुंबईला येऊ नये यासाठीचे प्रयत्न सुरू केले असून त्याचाच भाग म्हणून मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होऊन त्यांच्या मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
0 Comments