news today, मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या नांदगांव हद्दीवर भाजप कार्यकर्त्यांकडून ''सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वार'' नामकरण फलक

वैजापूर, ता.13 / प्रतिनिधी - भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या वैजापूर - येवला रस्त्यावरील नांदगांव हद्दीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 'सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वार' असे फलक लावून नामकरण केले. 

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दामोदर पारीख, ज्ञानेश्वर आदमाने, महेश भालेराव, सुधाकर डघळे, सचिन दाढे, बाळा श्रीवास्तव व त्यांच्या सहकाऱ्यांनी येवला रस्त्यावरील नांदगांव येथील मराठवाड्याच्या सरहद्दीवर "सरदार वल्लभभाई मराठवाडा प्रवेशद्वार " असे नामकरण करत फलक लावण्याचा उपक्रम राबविला. अशाप्रकारे नामकरणाची मागणी करणारे ई-मेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना वेळोवेळी करण्यात आले होते. या उपक्रमाची दखल केंद्र स्तरावरून घेण्यात आली असून या संकल्पनेला मूर्तरूप निकट भविष्यात येण्याची आता चिन्हे दिसत आहेत. अशी माहिती भाजपचे दामोदर पारीख यांनी दिली.

Post a Comment

0 Comments