news today, बहिणींनी बांधली पोलीस दादांना राखी ; अग्निपंख अकॅडमीच्या विद्यार्थिनींकडून अनोखा उपक्रम


वैजापूर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम 

वैजापूर, ता .14 / प्रतिनिधी - येथील श्रीकृष्ण ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित अग्निपंख करिअर अकॅडमीतर्फे वैजापूर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर मेढे , पोलीस अंमलदार योगेश झाल्टे यांच्यासह उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अग्निपंख अकॅडमीच्या विद्यार्थिनींकडून मंगळवारी राखी बांधण्यात आली. अग्निपंख अकॅडमी चे संचालक संतोष गोंधळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 


सण उत्सवाच्या काळात पोलिसांवर असलेला वाढता बंदोबस्ताचा ताण बघता पोलीस बांधवांना रक्षाबंधनाचा सण ड्युटीवर असताना साजरा करणे शक्य नसते. पोलीस कर्मचारी हे खरे बहिणींचे रक्षण करतात याची जाणीव ठेवून हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी आरती शेअरकर, प्रज्ञा दारुंडे,  तेजश्री ठेंगडे ,काजल चुगडे ,पूनम जाधव ,सरस्वती जाधव ,अश्विनी त्रिभुवन ,वैष्णवी बोरुडे, प्रज्वल नरोटे,  शामल झिंजुर्डे, मृणाल देवकर या विद्यार्थिनीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments