वैजापूर ता.13 / प्रतिनिधी - विजेचा शॉक लागून झिरो वायरमनचा मृत्यू झाला.ही घटना तालुक्यातील नांदगाव येथे सोमवारी (ता.11) सायंकाळी घडली. नारायण दिनकर राहाणे (वय 41 वर्ष) रा नांदगाव असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
नांदगाव येथील वायरमन यांनी नारायण राहाणे यांना हाताखाली कामाला ठेवलेले होते..सोमवारी ते गावातील धनश्री हॉटेल समोर विद्युत खांबावर वीज जोडणी चे काम करत होते. विद्युत खांबावर चढलेले असताना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी काळजी न घेतल्याने नारायण यांचा दुर्देवी मृत्यू झाला.वत्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.
0 Comments