मुंबई, ता.13 - सात वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोप प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संयोजक बच्चू कडू यांना मंगळवारी (ता.12) दोषी ठरवले व त्यांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. आमदार असल्याने त्यांना मारहाण करण्याचा परवाना मिळाला नाही अशी टिप्पणी ही विशेष न्यायालयाने त्यांना आरोपात दोषी ठरवताना केली. कडू यांना त्यांच्यावरील आरोपात दोषी ठरवून शिक्षा सुनावताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी त्यांना दहा हजार रुपयांचा दंड ही ठोठावला. तथापि, कडू यांच्याकडून या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईपर्यंत विशेष न्यायालयाने त्यांची शिक्षा स्थगित केली तसेच त्यांना जामीनही मंजूर केला. बच्चू कडू यांनी 26 सप्टेंबर 2018 रोजी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन संचालक प्रदीप पी. यांच्या कार्यालयाला भेट दिली होती नंतर शाब्दिक वादनंतर कडू यांनी त्यांना मारहाण केली होती असा त्यांच्यावर आरोप होता.
0 Comments