वैजापूर शहर व तालुक्यात अंगदान व देहदान जनजागृती
कार्यक्रमातून उत्तम प्रतिसाद
वैजापूर ता.13 / प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय अंगदान व देहदान जनजागृती दिनानिमित्त येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.13) झालेल्या बैठकीत डोणगांव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश साहेबराव डोखे, उपजिल्हा रुग्णालयात सेवेत असलेल्या मुख्य सेविका रुख्मिणी गवई व शेख उस्मान या तीन जणांनी उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्याकडे भरून दिला. या तिघांचा स्वातंत्र्यदिनी .सत्कार करण्यात येणार आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या या देहदान जागृती बैठकीस उपविभाग अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड ,तहसीलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.एन.मोरे, जिल्हा आरोग्य समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, नायब तहसीलदार कुमावत शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
.केंद्र व राज्य सरकार यांच्याव्दारे देशभर ही लोकजागृती चळवळ पंधरा ऑगस्टपर्यत चालू राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यात पुढाकार घेऊन संपुर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीसाठी सूचना केल्या आहेत.त्यानुसार आयोजित या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी देहदान ब अवयव दान याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या डोणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश साहेबराव डोखे, उपजिल्हारुग्णालयाच्या मुख्यसेविका रुख्मिनी गवई व शेख उस्मान यांनी देहदान फॉर्म भरून दिला. उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. ज्यांनी देहदानाचे फॉर्म भरले आहेत अशा लोकांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार करणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.बी.मोरे यांनी यावेळी सांगितले. बैठकीत अंगदान व देहदान शपथ ही घेण्यात आली. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयातील क्ष -किरण तज्ज्ञ किशोर वाघुले, वाल्मिक जाधव,बाळू पवार ,बाबासाहेब पगार वाल्मिक वाघ, एस, टी.सिरसाट, महेश शिंदे पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments