news today, वैजापूर येथील ज्येष्ठ नागरीक पोपटराव शिरसाट यांचे निधन


वैजापूर ता.17/प्रतिनिधी - येथील सुतार समाजातील जेष्ठ नागरिक पोपट रंगनाथ सिरसाट यांचे शनिवारी (ता.16 ) दुपारी
अल्पशा आजाराने आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 76 वर्ष होते..माजी आमदार स्व.आर. एम. वाणी यांचे ते कट्टर समर्थक होते.

त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाम मध्ये सायंकाळी सहा वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. या समयी माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेना तालुका प्रमुख सचीन वाणी, जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी, विजयसिंह राजपूत (फौजी), बापू गावडे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, मंगलसिंग राजपूत, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ..सविता निकाळे, बाबुराव पुणे, जेष्ठ परिचारिका निर्मला जाधव यांनी श्रद्धांजली अर्पण केली .येथील पालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य सेविका संगीता पोपटराव सिरसाट यांचे ते पती तर संभाजीनगर येथील कंपनीत असलेले पद्माकर सिरसाट यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना- नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments