वैजापूर, ता.08/ प्रतिनिधी - शहरातील गंगापूर रस्त्यावरील मोकळ्या जागेवर कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी कचरा टाकणाऱ्या गंगापूर रोडवरील अजित कलेक्शन या कापड दुकानदारावर एक हजार रुपये दंडाची कारवाई केली व मोकळ्या जागेवर टाकलेला कचरा पुन्हा दुकानात आणून टाकला.
वैजापूर नगरपालिकेचा मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी शहरात स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, नगरपालिकेकडून शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा साफ करण्यात येत आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक हे अजूनही उघड्यावर कचरा टाकत आहे. अशा बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील गंगापूर रोडवरील ओपन स्पेस वर असलेला कचरा हा याच परिसरातील अजित कलेक्शन नामक असलेल्या दुकानातून टाकण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सदरील कचरा पुन्हा अजित कलेक्शन या दुकानात आणत या दुकानाला एक हजार रुपयांचा दंड आकारला आहे. दरम्यान शहरातील अनेक भागात नागरिक हे उघड्यावर कचरा टाकत आहेत. अशा पद्धतीने जर दंडात्मक कारवाई सुरू असल्या तर नक्कीच शहरातून कचऱ्याचे ढिगारे कमी होतील.अशी शहरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.
0 Comments