news today, प्रत्येक समाजघटकांच्या हक्काचे संरक्षण करणं ही आमची मुख्य भूमिका - उपमुख्यमंत्री अजित पवार

कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाला उपमुख्यंत्री पवार यांची ग्वाही 

मुंबई, ता. 08 - कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला असून महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे या समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. प्रत्येक समाजघटकाच्या हक्काचं संरक्षण करणं आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणं हीच आमची मुख्य भूमिका आहे. या प्रकरणी योग्य ती पावलं उचलली जातील. 
असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाला दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी आ सना मलिक व कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाने मंत्रालय, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत शिष्टमंडळाने त्यांच्या समाजासमोरील प्रश्न व अडचणी मांडल्या. यासंदर्भात त्यांनी सादर केलेला विनंती अर्ज अजित पवार यांनी स्वीकारला व कुरेशी समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बैठकीस आमदार सना मलिक, आमदार संजय खोडके,माजी मंत्री नवाब मलिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती व कुरेशी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments