गारज ता .17/ प्रतिनिधी - वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांनी 2024--25 या त्यांच्या कार्यकाळामध्ये तालुक्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचा शासनाच्यावतीने नुकताच उत्कृष्ट पुरस्कार देऊन त्यांना संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते गौरविण्यात येऊन प्रशस्ती पत्र देण्यात आले. या सन्मानाबद्दल.तालुक्यातील गारज व परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने तहसीलदार सुनील सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
तहसीलदार सावंत यांनी आपल्या कार्यकाळामध्ये महसूल व इतर जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडून शासनाने ठरवलेल्या उद्दिष्टेपेक्षाही महसूल वसुली, ॲग्री स्टिक नोंदणी, पीक पाहणी, लाडकी बहिणी योजना, गौण खनिज आधीसह कारवाया यामध्ये सुनील सावंत यांनी उल्लेखनीय काम केले. त्यात मयत शेतकऱ्यांचे सातबारा वारसाच्या नावे करण्याची अनेक प्रकरणे मार्गी लावले म्हणून संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुनिल सावंत यांची उत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड केली. या अनुषंगाने गारज व परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचा उपजिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सत्कार करुन शुभेच्छा दिल्या यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सजन शिंदे, ह.भ.प. राधाजी सरोवर महाराज प्रभाकर जाधव, अवधूत ठुबे, राजाराम चेळेकर, बाळासाहेब कदम, व्यंकटराव जाधव, प्रल्हादराव शेळके आदी शेतकरी उपस्थित होते.
0 Comments