वैजापूर तालुक्यातील घायगाव गटातील वांजरगाव व भालगाव ही गावे वांजरगाव गटात, तर सवंदगाव गटातील वडजी हे गाव जरुळ गटात समाविष्ट
वैजापूर, ता .23 - जिल्हा परिषद, पंचायत समिती गट व गण प्रारूप आराखड्याबाबत आक्षेपांच्या सुनावणीनंतर विभागीय आयुक्तांनी सहा बदलांना मंजुरी दिली. प्रारूप आराखडयात बदल करून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.22) अंतिम आराखडा राजपत्रात प्रसिद्ध केला आहे. अंतिम आराखड्यातील 63 गट आणि 126 गणांनुसार येणारी निवडणूक होणार आहे. प्रभाग आराखड्यात सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव गट व बनोटी गणातील नायगाववाडी हे गांव सुताडा ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार गट व तळेगाव गणातील धानोरा, बिस्मिल्लाखावाडी ही गावे पाल गटात व जातेगाव गणात समाविष्ट करण्यात आली आहेत.तसेच बाभूळगाव खुर्द हे गाव पाल गण आणि गटातून वगळून बाबरा गट व गणात समाविष्ट करण्यात आले आहे..
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत
वैजापूर तालुक्यातील वडजी हे गाव सवंदगाव गट व गणातून वगळून सवंदगाव गट आणि जरुळ गणात समाविष्ट करण्यात आले आहे. याच तालुक्यातील घायगाव गटातील व लाडगाव गणातील वांजरगाव, भालगाव ही गावे वगळून वांजरगाव गट व गणात समाविष्ट करण्यात आली आहेत. पैठण तालुक्यातील नवगाव गट व चांगतपुरी गणातील तांदुळवाडी ग्रामपंचायत वगळून सोनवाडी खुर्द या गावाचा समावेश करण्यात आला आहे. हे बदल करून जिल्हयातील 63 गटांचा आणि 126 गणांचा अंतिम आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी राजपत्रात प्रसिध्द केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्द केलेल्या प्रारूप आराखड्यावर जवळपास 48 आक्षेप आले होते.यामध्ये गटाचे नाव बदला, लोकसंख्येनुसार घ्या असे आक्षेप प्रभाग रचनेप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे आले होते.
0 Comments