नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत आ.बोरणारे यांचेकडून अधिकाऱ्यांना सूचना
वैजापूर, ता.19- तालुक्यातील मौजे भग्गाव येथे गुरुवारी (ता.18) झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा कापूस, मका, सोयाबीन व इतर पिकांची हानी झाली.
आ. रमेश पाटील बोरणारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह शुक्रवारी (ता.19) सकाळी भगगावला भेट दिली व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
आ. बोरणारे यांनी तत्काळ फोन करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे योग्य पंचनामे करण्याबाबत तहसीलदार सुनील सावंत व संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना सूचना दिल्या. आपदग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
0 Comments