news today, ढोल वाजवून कांद्याचे मोफत वाटप ; सरकारी धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

नाशिक, ता.19 - कांदा दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादकांनी एकीकडे मंत्री व लोकप्रतिनिधींना फोन करो आंदोलनातून भंडावून सोडले असताना देवळा तालुक्यात शेतकऱ्यांनी ढोल वाजवून नागरिकांना मोफत कांदा वाटप करून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

लासलगाव बाजार समितीत गुरुवारी (ता.18) कांद्याला प्रतिक्विंटलला सरासरी 1175 रुपये भाव मिळाला. महिनाभरात दरात 500 रुपयांची घसरण झाली. अनेक राज्यात स्थानिक कांदा बाजारात आल्याने नाशिकच्या कांद्याची देशांतर्गत मागणी घटली आहे. अडथळे कायम असताना श्रीलंकेने आयात शुल्कात वाढ केल्याचा निर्यातीवर परिणाम झाला.याच सुमारास नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाने दर स्थिरीकरण योजनेत खरेदी केलेला कांदाही दिल्लीमध्ये कमी दराने विक्रीला आणला आहे.

Post a Comment

0 Comments