news today, वैजापूर पालिकेतर्फे सामाजिक समता सप्ताहनिमित्त भारतीय घटनेच्या उद्देशिकेचे वाचन व वाटप

वैजापूर ता.08 - शासनाच्या  निर्देशानुसार महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वैजापूर नगरपालिकेतर्फे बुधवारी (ता.08) महात्मा जोतिबा फुलें व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भारतीय घटनेच्या उद्धेशिकेचे वाचन करून उद्देशिकेची प्रत उपस्थित नागरिकांना नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी व नगरसेवक यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली.

मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या मार्गर्शनाखाली या उद्धेशिकेचे वाचन सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. या सामाजिक समता सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम घेण्याचे आवाहनही उपस्थिताना राजपूत यांनी केले. 

या प्रसंगी माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, नगरसेवक विशाल संचेती, दशरथ बनकर, उल्हास ठोंबरे, प्रशांत कंगले, राजेश गायकवाड, स्वप्निल जेजुरकर, पारस घाटे, हमीद कुरेशी, आमीरअली, राहुल त्रिभुवन, ज्योती जोशी, जयश्री राजपूत, दिपा राजपूत, बाबासाहेब पुतळे, गणेश खैरे, श्रावण चौधरी, विनोद राजपूत, डॉ, बी.बी.शिंदे, पत्रकार सुनील त्रिभुवन, विलास म्हस्के, दीपक बरकसे, विशाल त्रिभुवन, बाबासाहेब गायकवाड, शंकर पहलवान, चांगदेव उघडे, बजरंग मगर, सुरेश राऊत, मधुकर पवार, किशोर साळुंकर, सुवर्णा बोर्डे, निर्मला जाधव, पालिकेचे श्री साठे, श्री.मिरगु, जयपाल राजपूत, शंकर जोरे, संतोष रत्नपारखी, राजू इंगळे, ज्ञानेश्वर सिरसाट, मंजिरी खैरे, सुनील भाग्यवंत, दिवाकर त्रिभुवन, बी.बी.जाधव,मनीष गणवीर, कृष्ण त्रिभुवन, स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन ,पालिका शाळांचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments