वैजापूर, ता.10 - छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा अहीर सुवर्णकार समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा सोहळा सिडको एन-6 मधील सुवर्ण शिल्प मंगल कार्यालयात रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. वैजापूर येथील मुकूंद दाभाडे, विजय जाधव, हेमंत दाभाडे (विशेष कार्यकारी अधिकारी), विशाल दाभाडे व गिरीष चापानेरकर या पाच जणांना समाज भुषण पुरस्कार मिळण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. त्यांच्यासह अन्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास व्यासपीठावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका सुनिता मधुकर सोनवणे, नगरसेवक विश्वनाथ स्वामी, ॲड.हर्षल रणधीर, अभय दंडगव्हाळ, मनोज विखणकर, सराफा फेडरेशनचे अध्यक्ष सोपानराव मुंडलिक आणि मनोहर विखणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. .
यावेळी नंदकुमार बावीस्कर, राजेंद्र भालेराव, मुकुंद दाभाडे, कार्तिक थोरात, सिद्धी थोरात, शरदचंद्र पवार, सरिता बाविस्कर, मिना भालेराव, राजेंद्र मोरे, उषा मोरे, सुरेश टाक, कमलाकर चौधरी, चंचल चौधरी, हेमंत दाभाडे, कृपेश पवार, निवृत्त बँक अधिकारी प्रभाकर सोनवणे, अरविंद पिंगळे, ज्ञानेश्वर बाविस्कर उपस्थित होते. प्रास्ताविक पंडीतराव दुसाने यांनी केले. सूत्रसंचालन रेखा दाभाडे आणि रंजना सोनवणे यांनी केले.
0 Comments